मालवणच्या रामेश्वर मंदिरात ११ ते १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार…

117
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता.२४ : मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ११,१२, १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार होणार आहे.
यात ११ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सर्व देवतांना आमंत्रण श्री गणेश पूजन पुण्याहवाचन, १२ वाजता श्री देव रामेश्वर महारुद्र अभिषेक व शोडषोपचार पूजा, सायंकाळी ६ ते ७.३० वाजता कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ आनंदवाडी व श्रीदेवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी कुडाळ बुवा अरुण घाडी यांचे भजन होणार आहे.

१२ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून श्री देव रामेश्वर उर्वरित महारुद्र अभिषेक व शोडषोपचार, दुपारी १२ वाजता पूजा अग्नी स्थापना व देवता स्थापना ग्रह यज्ञ, सायंकाळी ५.३० वाजता सुरसंगम संजय वराडकर ग्रुप यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. हरिहर नातू यांचे कीर्तन होईल. १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून श्री देव रामेश्वर शोडषोपचार पूजा स्थापित देवता पूजन आणि रुद्र स्वाहाकार बलिदान पूर्णाहुती उपस्थित जणांना मंत्राभिषेक आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद होईल. सायंकाळी ५.३० वाजता मेस्त्री आणि सहकारी यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता घुमडे प्रासादिक भजन मंडळ बुवा नाना सामंत यांचे भजन होईल. तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी इत्यादी ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.