कांदळगावातील शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी निलेश राणेंचा पुढाकार…

97
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २४ : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं. २ या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती. या संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी आज कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. जर प्रशासनाकडून कार्यवाही करण्यास विलंब होत असेल तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीच काम करण्याची व्यवस्था केली असून आजपासून या शाळेच्या दुरुस्तीच काम सुरू होईल. लवकरात लवकर ही शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होईल. असे स्पष्ट केले.