गोव्यात चोरीस गेलेली दुचाकी वागदेत सापडली…

174
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२४: म्‍हापसा-गोवा येथून चोरीस गेलेली दुचाकी आज कणकवली शहरालगतच्या वागदे येथील पेट्रोलपंप परिसरात आढळून आली. कणकवली पोलिसांनी ती दुचाकी आज सायंकाळी ताब्‍यात घेतली. शहरातील वागदे येथील पेट्रोल पंपालगतच्या ओम साई ॲटो गॅरेजसमोर गेले पंधरा दिवस निळ्या रंगाची होंडा ॲक्‍टीव्हा (जीए ०३ एसी ८७२१) दुचाकी बेवारस स्थितीत असल्‍याची बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्‍यांनी याबाबतची माहिती गुन्हा अन्वेषण पथकाला दिली. त्‍यानंतर सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, राजू जामसंडेकर यांनी दुचाकी ताब्‍यात घेतली. या दुचाकी बाबत अधिक माहितीसाठी म्‍हापसा येथील पोलीस स्थानकात संपर्क साधण्यात आला. त्‍यावेळी म्‍हापसा गोवा येथून ही दुचाकी १० जून रोजी चोरीस गेल्‍याची फिर्याद नमूद असल्‍याचे लक्षात आले. या दुचाकीचे आरसीबुक व इतर कागदपत्रे गोवा पोलिसांकडून मागविण्यात आली आहेत. तसेच दुचाकी चाेरीबाबत तपास सुरू असल्‍याची माहिती कणकवली पोलिसांकडून देण्यात आली.