कणकवली उपजिल्हा रूग्‍णालयातील ऑपरेशन थिएटर पुन्हा रुग्णसेवेत…

180
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२४: गेले काही दिवस बंद असलेले कणकवली उपजिल्‍हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. याचा शुभारंभ डॉ.हेमा तायशेटे यांनी केला. दुरूस्तीच्या कामासाठी कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयातील शस्त्रक्रिया विभाग बंद करण्यात होता. या विभागातील डागडुजीचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्‍यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे काम योग्‍य झाल्‍याचा अहवाल आल्‍यानंतर आज डॉ.हेमा तायशेटे यांच्या हस्ते ऑपरेशन थिएटर विभागाचा फित कापून शुभारंभ करण्यात आला. तसेच शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आल्‍या. त्‍यामुळे कणकवली सह अन्य तालुक्‍यातून येणाऱ्या रूग्‍णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमावेळी डॉ. महेंद्र आचरेकर, शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख नुपूर पवार, अधिपरिचारिक श्रद्धा तेंडोलकर, औषध निर्मात विद्याधर हनुमंते यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.