झाड तुटून थेट विजवाहिन्यावर, सुदैवाने युवक बचावला…

602
2
Google search engine
Google search engine

खासकीलवाडा येथील घटना; माजी नगरसेवक उमा वारंग यांची नाराजी…

सावंतवाडी,ता.२५: भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळल्याचा प्रकार आज खासकीलवाडा येथे घडला. यात समीर पडते नामक युवक सुदैवाने बचावला. ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात घडली. याबाबतची माहिती माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी दिली.
दरम्यान असाच प्रकार घडून मागच्या वर्षी दोघे युवक ठार झाले होते. त्यानंतर हा प्रकार पुन्हा घडल्याने श्री. वारंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेळोवेळी पालिका प्रशासन आणि वीज वितरण कंपनीला झाड तोडण्याची विनंती करून सुध्दा हे झाड तोडले नसल्याचा आरोप तेथील नागरीक शरद जामदार यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासकिलवाडा तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात असलेले जुने झाड वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळले. यात शरद जामदार यांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले असून या ठिकाणावरून जात असलेला समीर पडते नामक युवक गाडीवरून उडी मारल्याने बचावला आहे. दरम्यान पालिकेला याबाबतची कल्पना देऊन देखील हे झाड तोडण्यात आले नसल्याने श्री. वारंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या ठिकाणी महावितरणाचे सहाय्यक अभियंता श्री. खोब्रागडे, कनिष्ठ अभियंता सुहास परब आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाड तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी मुकादम शेखर मेहत्तर, चंद्रकांत कदम, नितीन कदम, संदीप पाटील, आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते.