इंडिया आघाडीचे रमेश किर यांना आपचा पाठिंबा नाही…

186
2
Google search engine
Google search engine

विवेक ताम्‍हाणकर : मैदानात उतरण्याचा धडाका किर यांच्याकडे नाही…

कणकवली,ता.२५ : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत इंडिया आघाडीचे रमेश किर यांना आम आदमी पक्षाचा पाठिंबा नाही. आप चे कार्यकर्ते यावेळी तटस्थ राहणार आहेत. रमेश किर यांनी या निवडणुकीत धडाडीने उतरायला हवे होते. पण तो धडाका त्‍यांच्याकडे नाही. आमच्याशी साधे दोन शब्‍दही ते बोलू शकले नाहीत अशी भूमिका अाम आदमी पार्टीचे जिल्‍हाध्यक्ष विवेक ताम्‍हणकर यांनी आज मांडली.
श्री.ताम्‍हाणकर म्‍हणाले, इंडिया आघाडीचा पाठिंबा असलेल्या रमेश किर यांनी आप सारख्या लोकप्रिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीत साधे विश्वासातही घेतले नाही. कुडाळ येथे आघाडीतील पदाधिकाऱ्यांना भेटायला आलेले .िकर ओळख सांगूनही आमच्याशी साधे दोन शब्द बोलू शकले नाहीत.
ताम्‍हाणकर म्‍हणाले, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ राहणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे निवडणुकी आधीच गोंधळलेले आहेत, त्यामुळे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचता आलेले नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किर हे ज्या ताकदीने निवडणूक मैदानात उतरायला हवे होतो तो धडाका त्यांच्यात दिसत नाही.
ताम्‍हाणकर म्‍हणाले, कोकणात आधीच लोकसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव झालेला आहे. अशावेळी सर्वांनी एकजूट दाखवणे महत्वाचे असताना पदवीधर मतदार संघातील उमेदवार नेमक्या कोणत्या गैरसमजात आहेत हे समजत नाही. ही निवडणूक किर हे नेमके जिंकण्यासाठी की हरण्यासाठी लढत आहेत हेच समजत नाही. हरायचं होत तर निवडणूक रिंगणात का उतरलात असे विचारतानाच त्यापेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांनी चांगला लोकसंपर्क आणि मतदारांशी संवाद साधला होता त्यांना तरी उमेदवारी मिळाली असती तर मोठी चुरस निर्माण झालेली आज पाहायला मिळाली असती असेही ताम्हणकर म्हणाले.