डॉ. महेश केळुसकर यांचा साहित्य प्रवास उलगडणार…

50
2
Google search engine
Google search engine

२९ जूनला कणकवलीत कार्यक्रम;
रंगकर्मी वामन पंडित साधणार संवाद…

कुडाळ,ता.२५: “माझ्या साहित्याची मूळं मालवणी मुलखात आहेत”, असं सांगणाऱ्या डॉ. महेश केळुसकर यांचा ४५ वर्षांचा साहित्य प्रवास येत्या शनिवारी २९जूनला कणकवलीत उलगडला जाणार आहे.
हळवल- कणकवली येथील ‘निलायम’ (द ब्ल्यू बॉक्स)मध्ये ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित केळुसकरांशी सायंकाळी ६ वाजता संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या मालवणी आणि मराठी कविताही ऐकायला मिळणार आहेत.
डॉ. महेश केळुसकर यांची पहिली कविता जून १९७९ च्या ‘सत्यकथा’ अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर कविता,कथा,कादंबरी,ललितगद्य,बालसाहित्य, समीक्षा, लोककला संशोधन, चित्रपट लेखन आदी साहित्य प्रकारातील एकूण ४३ पुस्तके प्रकाशित झाली. अलिकडेच ९जून २०२४ ला त्यांची चार पुस्तके एकदम प्रकाशित झाली. जून १९७९ ते जून २०२४ पर्यंतचा त्यांचा हा साहित्य प्रवास दीड तासात, ‘कविता आणि गप्पा महेश केळुसकरांशी’ या कार्यक्रमातून रसिकांसमोर सादर होणार आहे.