सावंतवाडी नॅबच्या वतीने २९ जूनला मेळाव्याचे आयोजन…

44
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सिंधुदुर्ग, सावंतवाडीच्या वतीने दृष्टीबाधित लाभार्थ्यांसाठी २९ जूनला हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नॅबच्या लाभार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सेक्रेटरी सोमनाथ जीन्नी व खजिनदार आबा कशाळीकर यांनी केले आहे.