रेशन कार्ड धारकांसाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन सक्तीचे…

226
2
Google search engine
Google search engine

बाळू सावंत; बांद्यात कार्डधारकांना आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन…

बांदा,ता.२५: शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व व्यक्तींचे आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करणे सक्तीचे केले आहे. अन्यथा रेशनकार्ड मधून संबंधित नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी रेशनकार्ड धारकांची राहील. त्यामुळे आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या असे आवाहन सोसायटी चेअरमन राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे. तसेच कुटुंबातील नमूद सर्व व्यक्तींचे अपडेट केलेल्या आधार कार्ड आणि शिधापत्रिका यांची छायांकित प्रत रेशन दुकानात ३० जून पर्यंत जमा करावी असेही त्यांनी म्हटले आहे.