सांज्याव सणानिमित्त अर्चना घारे यांनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या शुभेच्छा…

143
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: संत जॉन बाप्तिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा ‘सांज्याव’ हा सण काल ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या सणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पिटर फर्नांडिस, डॉ. आगस्तीन डिसोझा, सुजाता फर्नांडिस, नोबेर्ट माडतिस, फॅलेक्स फर्नांडिस, आर्कजन डिसोझा आदी ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो. बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. त्यामुळे विहिरीत उडी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रघात ख्रिस्ती धर्मात आहे. धो-धो पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून हातामध्ये माडाचे पिडे व वाद्यांचा गजर करीत ख्रिस्तीबांधव या दिवशी गटागटाने फिरत असतात. मौजमस्ती करीत कोकणी गाणी, कातारा गात, घुमट वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात. त्यांच्या आनंदात सहभाग म्हणून सौ. घारे यांनी उपस्थिती दर्शवली.