अर्चना घारेंच्या माध्यमातून मिलाग्रीस हायस्कूलच्या डायरीचे अनावरण…

166
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शालेय डायरी तसेच वार्षिक थीमचा अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा व शाळेच्या माजी विद्यार्थिनी अर्चना घारे-परब उपस्थित होत्या. यावेळी सौ. घारे यांच्या हस्ते डायरीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सौ. घारे यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत शाळेला भेटवस्तू म्हणून वॉटर फिल्टर प्रदान केला. याप्रसंगी शाळेची इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रेया श्रीकृष्ण मेस्त्री हिने शाळेसाठी मदत म्हणून रोख रक्कम देणगी म्हणून प्रदान केली. ही रक्कम तिने पैसे साठवून जमा केलेली होती. यावेळी तिचे मान्यवरांनी तसेच मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना यांनी मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांना वार्षिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक विवेकानंद जोशी यांनी केले.