तळकट गावात बदलत्या वातावरणामुळे सर्दी-तापाचे रुग्ण…

95
2
Google search engine
Google search engine

योग्य ती उपाययोजना करा, माजी सरपंच रामा सावंतांची मागणी…

दोडामार्ग,ता.२५: तालुक्यातील तळकट गावासह आजूबाजूच्या गावात बदलत्या वातावरणामुळे सर्दी तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच हे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून काही जण भीतीपोटी उपचार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने तात्काळ शोध मोहीम राबवून योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणी तळकट माजी सरपंच रामा सावंत यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यातील अनेक लोक सर्दी तापापासून आजारी आहेत. मात्र हे रुग्ण शासकीय रुग्णालयात भीतीपोटी उपचार घेण्याऐवजी खाजगी उपचारावरच भर देताना दिसत आहेत. मात्र उपचार घेऊनही या रुग्णांना बरे वाटत नसल्याने हे रुग्ण त्रस्त आहेत. याचा परिणाम त्यांना आत्ता लक्षात येत नसल्याने याबाबत आरोग्य यंत्रणेने लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. रुग्ण आरोग्य केंद्रात गेल्यास त्या ठिकाणी आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल व डेंगू सारखा आजार असल्यास आपल्याला गोवा-बांबोळी यासारख्या रुग्णालयात जावे लागेल या भीतीपोटी रुग्ण आजार अंगावरच झेलत आहेत. याबाबत शोध मोहीम हाती घेऊन आरोग्य यंत्रणेने वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. असे त्यांनी म्हटले आहे.