सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी पुन्हा आंदोलन… 

130
2
Google search engine
Google search engine

आजच्या बैठकीत निर्णय; दंडवतेंच्या नावासह पाणी योजनेसाठी पाठपुरावा करणार…

सावंतवाडी,ता.२५: सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस, नळपाणी योजना, प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे अशा विविध मुद्द्यांवर रेल्वेमंत्री, खासदार आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यासाठी तारीख निश्चित करण्याचे ठरले आहे. कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम वाचन मंदिर मध्ये बैठक ही घेण्यात आली होती.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रमेश बोंद्रे, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, अभिमन्यू लोंढे, मिहीर मठकर, सुभाष शिरसाट, रवींद्र ओगले, तेजस पोयेकर, विहंग गोठोसकर आदी उपस्थित होते. यावेळी सचिव मिहीर मठकर यांनी आढावा घेतला. यानंतर सावंतवाडी टर्मिनस, नळपाणी योजना, प्रा मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे, रेल्वे या मागण्यांची पूर्तता करताना रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा. टर्मिनस ९ वर्ष प्रतिक्षेत आहे.ते व्हावे त्यासाठी आर्थिक तरतूद केली जावी. भारतीय रेल्वे बोर्डात कोकण रेल्वे विलीनीकरण झाले पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच रेल्वे स्थानकावर अडचणी आहेत. याबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे. कोकण रेल्वेने दखल घेतली नाही तर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा विचार करण्यात आला. या आंदोलनाची तयारी सुरू असून तारीख लवकरच जाहीर करण्यात यावी असे ठरविण्यात आले आहे.