कुडाळ येथील “महेंद्रा अकॅडमीचे” थाटात उद्घाटन…

354
{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine

एकनाथ पाटीलांची प्रमुख उपस्थिती; महेंद्र पेडणेकर यांना दिल्या शुभेच्छा…

कुडाळ ता.२५: येथे नव्याने सुरू झालेल्या “महेंद्रा अकॅडमी” शाखेचा शुभारंभ आज “तात्यांचा ठोकळा” या पुस्तकाचे लेखक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धा राणी भोसले, सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, अभिनेते विवेक वाळके आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या माध्यमातून कोकणात विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असा विश्वास श्री. पेडणेकर यांनी व्यक्त केला. तर कोकणात अशा प्रकारची संस्था सुरू करून त्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम करणाऱ्या “महेंद्रा अकॅडमीचे” कार्य कौतुकास्पद आहे. आपण त्यांना लागणारी मदत निश्चितच करू, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. तर “महेंद्रा अकॅडमीचा” प्रवास सावंतवाडीतून सुरू झाला आणि आज कुडाळ पर्यंत येऊन पोहोचला आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी घडावेत आणि कोकणाचे नाव उंच व्हावे, अशा शुभेच्छा युवराज लखमराजे भोसले यांनी दिल्या.