कोकण पदवीधर निवडणुकीसाठी वेंगुर्ल्यात ८४.५६ टक्के मतदान…

156
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२६: कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज पहाटे ७ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. वेंगुर्ले तालुक्यात ३ केंद्रांवर मिळून एकूण ८४.५६ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील ३ मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. वेंगुर्ले तालुक्यात रिमझिम पाऊस असतानाही सकाळ पासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या.

वेंगुर्ले तहसील कार्यालयातील ११७ मतदान केंद्रांवर ८३.६ टक्के मतदान झाले. ११७ अ मतदान केंद्रावर ८४.५ टक्के मतदान झाले. तर शिरोडा तेथील मतदान केंद्रावर ८७ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रांबाहेर प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे बूथ लागले होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गावंडळकर यांच्यासह महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती.