विशाल परबांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दप्तर व पुस्तके वाटप…

382
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२७: भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सांगेली येथील एक नंबर शाळेत मुलांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला. यावेळी रवी माडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, माजी सरपंच वामन नार्वेकर, माजी सैनिक आनंद राऊत, दयानंद सावंत, शांताराम सावंत, बाळा राऊत, संतोष नार्वेकर, महेश राऊळ, महेश रेमुणकर, सुनैना सांगेलकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विशाल परब यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.