कोकण पदवीधर मतदार संघातून कोकणात ६४.१४ टक्के मतदान…

72
2
Google search engine
Google search engine

१ लाख ४३ हजार मतदारांनी बजावला हक्क; १ जुलैला मुंबईत होणार मतमोजणी…

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: कोकण पदवीधर मतदार संघाच्या काल झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कोकणात ६४.१४ टक्के मतदान झाले. यावेळी तब्बल १ लाख ४३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान या मतदानाची मतमोजणी १ जूलैला नेरुळ नवी मुंबई येथे होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया काल पार पडली. यात कोकण विभागातून पाच जिल्ह्यातील मतदान झाले.

मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष, ५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण १ लाख २० हजार ७७१ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ४१ हजार ४४ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ६७ हजार ६४६ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.