जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम करा…

33
2
Google search engine
Google search engine

गणेश कुशे; वेंगुर्ला तालुका वैश्य समाजाचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव उत्साहात…

वेंगुर्ले,ता.२७: जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे तरच यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. तसेच नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्था फोंडाघाट चे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी आज व्यक्त केले.

वेंगुर्ला तालुका वैश्य समाज संस्थेचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वेंगुर्ला तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे, उपाध्यक्ष सुहास गवंडळकर, खजिनदार सुरेश भिसे, शिरोडा प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, म्हापण प्रतिनिधी आकाश नार्वेकर आदी उपस्थित होते.

यावेळी दहावी, बारावी, आणि पदवी परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर अनंत अशोक स्वार, श्रीमती विद्या महादेव शिरसाट व राजेश गुरूनाथ शिरसाट यांच्या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली.

दरम्यान वैश्य समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यापारी माजी नगरसेवक राजीव राधाकृष्णन पांगम व निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ विष्णू गोवेकर यांना देण्यात आला.

यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील मोठ्या संख्येने वैश्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कपिल पोकळे यांनी तर आभार अमृत काणेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन अंधारी, अनुप काणेकर, राकेश सापळे, गणेश अंधारी, तन्मय मुळीक. आर्यन डुबळे यांनी परीश्रम घेतले.