विनयभंगाच्या आरोपातून नवाबाग-उभादांडा येथील एकाची निर्दोष मुक्तता… 

139
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२७: महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून नवाबाग-उभादांडा येथील एकाची आज जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. रोहिदास नामदेव मोर्जे असे त्याचे नाव आहे. ही घटना २५ जून २०१७ ला वेंगुर्ले येथे घडली होती. या प्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मोर्जे याला अटक करण्यात आली होती. हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता. याकामी सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. परंतू संबंधित संशयित हा मुकबधीर आहे तसेच फिर्यादी व संशयित यांच्यात गेली २० हून अधिक वर्षे जमिनीच्या कारणावरुन वाद आहेत, असा युक्तीवाद ग्राह्या धरुन त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी अ‍ॅड. मिहीर भणगे, सुनिल मालवणकर, तेजाली भणगे, आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.