बांदा शहरातील विजेच्या समस्याबाबत भाजपा आक्रमक…

77
2
Google search engine
Google search engine

वीज अधिकार्‍यांना विचारला जाब; दोन दिवसात स्थिती सुधारण्याच्या सुचना…

बांदा,ता.२७: शहरात गेले अनेक दिवस विजेचा लंपडाव सुरू आहे. याबाबत वारंवार लक्ष वेधून सुध्दा अधिकारी सुशेगाद असल्याचा आरोप करुन आज येथील भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडून विज अधिकारी एस.आर. कोहळे यांना जाब विचारण्यात आला. दरम्यान नागरिकांचा रोख लक्षात घेता कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी समन्वय साधून येत्या २ दिवसात योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी भाजपाचे युवा नेते जावेद खतिब आणि बाळू सावंत यांनी केली.

शहरात प्रस्तावित असलेल्या ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर कार्यान्वित करावेत. जीर्ण वीज खांब, जीर्ण वीज वाहक तारा तातडीने बदलाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन श्री. कोहळे यांनी दिले.यावेळी गुरुनाथ सावंत, साईनाथ धारगळकर, हेमंत दाभोलकर, विकी कदम, शुभम साळगावकर आदी उपस्थित होते.