सावरवाड येथ केलेल्या कृषीदुतांच्या प्रकल्पाची कृषी शास्त्रज्ञांकडून पाहणी…

168
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोसचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सावरवाड येथे अझोलाची शेती व गांडूळ खताची निर्मिती प्रकल्पाचे युनिट तयार केले आहे.
या प्रकल्पाला कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बी.के. गावडे, डॉ. विलास सावंत, डॉ. केशव देसाई, बी.वी. काजरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषिदुत अथर्व मठकर, लक्षदिप शेटकर, श्रीनिवास वाळके, ऋत्विक तेली, अनिरुद्ध.पी, अरुणदेव. सी.पी आदी उपस्थित होते. यांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, डाॅ.विकास धामापूरकर, प्रा. गोपाल गायकी, डॉ. बापू भोगटे, प्रा. भावना पाताडे यांचे मार्गदर्शन लाभले.