महाविद्यालयाच्या नावाचा फलक मराठीत लावा…

114
2
Google search engine
Google search engine

मनसे विद्यार्थी सेनेची मागणी; पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन…

सावंतवाडी,ता.२८: इंग्रजी भाषेत उल्लेख असलेला महाविद्यालयाच्या नावाचा फलक मराठी भाषेत लावण्यात यावा, अशी मागणी आज येथे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून देण्यात आले. याबाबत सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासन श्री. भारमल यांनी दिल्याचे मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, ज्ञानेश्वर जाधव, रोहित जाधव, ओंकार जाधव आदी उपस्थित होते.