विधान परिषदेसाठी विनायक राऊत यांचे नाव चर्चेत…

765
2
Google search engine
Google search engine

खुद्द उद्धव ठाकरेंकडून पसंती; राणेंना रोखण्यासाठी पुन्हा संधी…

मुंबई ता.२८: विधान परिषदेवर माजी खासदार विनायक राऊत यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाला खुद्द ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पसंती दर्शवली असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाला होता. त्या ठिकाणी शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे निवडून आले आहेत. त्यामुळे कोकणात शिवसेना वाढण्यासाठी पुन्हा एकदा राऊत यांच्या नावाची चर्चा आहे.
आता होवू घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीतून त्यांना विधान परिषदेत पाठवण्याची तयारी खुद्द पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडूनच सुरू आहे. राऊत यांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना वाढली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. परंतु आता नारायण राणे यांना रोखण्यासाठी त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.