सावंतवाडीतील आरपीडी कॉलेजमध्ये परफेक्ट अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच सुरू…

90
2
Google search engine
Google search engine

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेईई नीट आणि एमएचटी-सीईटी यासारख्या प्रवेश परीक्षांमध्ये क्रांतीवर्धक निकाल देणाऱ्या, परफेक्ट अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच नुकतीच येथील आरपीडी ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा या बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये सहभाग घेतला आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून देखील विद्यार्थी, कोटा येथील सुप्रसिद्ध फॅकल्टीज प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शन, तसेच आरपीडी जूनियर कॉलेजच्या स्टेट बोर्ड च्या शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन घेण्यासाठी सहभागी होत आहेत. परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांनी, पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, जेईई नीट, यासारख्या परीक्षांची स्पर्धा प्रचंड असल्याने, तसेच या परीक्षांचा सिल्याबस हा सीबीएससीचा असल्याने, अकरावी बारावी पूर्ण कॉलेज करून, फक्त संध्याकाळच्या वेळेमध्ये क्लासेस करण्याने परीक्षा क्रॅक करणे फार अवघड जाते.

परंतु आरपीडी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, तसेच परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सावंतवाडी मध्ये, स्टेट बोर्डाचा अभ्यास करता करता आता विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांची तयारी, आरपीडी विद्यालयाच्या कॅम्पस मध्येच करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी न दवडता त्वरित स्कॉलरशिप साठी परफेक्ट अकॅडमी कार्यालय आरपीडी येथे संपर्क साधावा, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे. पुणे, मुंबई, कोटा, लातूर येथील तुलनेत निम्म्याहून कमी फी मध्ये ही सुविधा आपल्या जिल्ह्यातील मुलांना देणार असल्याचे प्राध्यापक परब यांनी सांगितले.