रोटरीच्या रेट्यामुळे अनेक वर्षे रखडलेला चुरणीची मुस येथील रस्ता मार्गी…

94
2
Google search engine
Google search engine

सुहास सातोसकर; सावंतवाडीचे फिजिओथेरपी सेंटर आधुनिक, कमी खर्चात सेवा देणार…

सावंतवाडी,ता.२९: येथील रोटरी क्लबच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेला चौकुळ चुरणीची मुस व बेरडकी-धनगरवाडीकडे जाणारा रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी वनविभागाचे अधिकारी नवकिशोर रेड्डी यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता तेथील ग्रामस्थांना होणार आहे, असा दावा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी केला. दरम्यान भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गरजूंना रोटरीच्या माध्यमातून २०० हून अधिक जणांना बायोगॅस देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या फिजिओथेरपी सेंटरचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी स्पीच थेरेपी आणि ऑडीओमॅट्री टेस्ट या २ सेवा आता अत्यंत माफक दरात सुरू करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सातोसकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या नव्या कार्यकारीणीने आपण दिलेला शब्द पुर्ण केला. यात चौकुळ येथे २० कुंटूबांना बायोगॅस देण्याचे मान्य केला होता. मात्र आम्ही आमचे टार्गेट पुर्ण करुन आणखी काही जणांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. परंतू रोटरीच्या पदाधिकार्‍यांनी वनविभागाचे अधिकारी नवकीशोर रेड्डी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले असून आता काही महिन्यातच हा रस्ता पुर्ण होणार आहे.

सातोसकर पुढे म्हणाले, या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून फिजिओथेरपी सेंटर मध्ये येणार्‍या रुग्णांना चांगल्या सेवा देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने आम्ही सेंटर अत्याधूनिक केले आहे. आता या ठिकाणी स्पीच थेरेपी आणि ऑडीओमॅट्री टेस्ट करण्यात येणार आहे तसेच रुग्णांना लागणारे सर्जिकल साहित्य अगदी कमी भाड्याच्या दरात तर गरीबांना मोफत वापरण्यास देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर रोटरीचे उत्पन्न वाढावे यासाठी राजवाडा येथील कार्यालयाच्या परिसरात असलेला हॉल बैठका तसेच वाढदिवस, छोटे कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीज-जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी सचिव प्रविण परब, भास्कर रासम, राजू पनवेलकर, विनया बाड, दिलीप म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.