विहिरीत पडलेल्या श्वानाला रवी जाधव यांच्याकडून जीवदान…

190
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: येथील माधव भाटले परिसरात विहिरीत पडलेल्या श्वानाला रवी जाधव यांनी जीवदान दिले. त्याला वाचविण्यासाठी ते आपण स्वतः विहिरीत उरतले. श्री. जाधव हे सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्य करतात. त्यातच त्यांनी ही भुतदया दाखविल्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे. येथील माधव भाटले परिसरातील विहिरीत श्वान पडल्याची माहिती सीताराम गावडे यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ धाव घेवून त्या ठिकाणी मदतकार्यात सहभाग घेतला.