सिंधुदुर्गात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार…

290
2
Google search engine
Google search engine

संजना सावंत यांची ग्‍वाही : पाणबुडी प्रकल्प, स्कुबा सेंटर साठी निधीची तरतूद झाल्‍याबद्दल शासनाचे आभार

कणकवली, ता.२९ : राज्‍य शासनाने महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्‍ही प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली. तसेच जिल्ह्यात पाणबुडी प्रकल्‍प आणि स्कुबा डायव्हींग सेंटरसाठी निधीची तरतूद केल्‍याबद्दल त्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात संजना सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्‍हणाल्या, यंदाच्या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री अजित पवार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे आपण आभार मानत आहोत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून योजना प्रभावीपणे राबवली जाईल असेही सावंत यांनी सांगितले.
सावंत म्‍हणाल्या, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रूपये देण्यात येणार. या योजनेसाठी सरकारकडून ४६ हजार कोटी रुपयांचा भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ९५ लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्‍याचबरोबर पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना पोषक ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.
.सिंधुदुर्गात स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारणार त्यासाठी २२ कोटी रुपये, वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्पासाठी तरतूद ४४ कोटी रुपये,औ‌द्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी तरतुदी,कोकणातील कातळ शिल्पाच्या संवर्धनासाठी युनेस्कोकडे पाठपुरावा कार्यासाठी प्रयत्न करणार,शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली माहिती सावंत यांनी दिली त्यावेळी त्यांनी सरकारचे आभार मानले. संजना सावंत यांच्यासोबत यावेळी संजना सदडेकर, प्राची कर्पे, करंजे सरपंच सपना मेस्त्री, मेघा सावंत, साक्षी वाळके, नागवे सरपंच सिद्धीका जाधव, प्रतीक्षा सावंत, आदी उपस्थित होत्या.