आडेलीतील शेतकरी प्रशांत गवळी यांना भाजप कडून आर्थिक मदत…

185
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२९: म्हैशीवर विद्युत वाहिनी पडून नुकसान झालेल्या आडेली येथिल शेतकरी प्रशांत गवळी यांना भाजपच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली

यावी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून शासन स्तरावरून जास्तीत-जास्त नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन ही त्यांनी दिले.

यावेळी गावच्या सरपंचा सौ. यशस्वी कोंडसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, तेर्सेबांबार्डे ग्रामपंचायत सरपंच रामचंद्र परब, आडेली शक्तिकेंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, तेर्सेबांबार्डे शक्तिकेंद्र प्रमुख अजय डिचोलकर, पोलीस पाटील पांडुरंग आडेलकर, राजु सामंत, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मेस्त्री, प्रकाश साटेलकर, राजेश गवळी, दत्ताराम गवळी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.