वाफोली धरण परिसरात अखेर दिशादर्शक फलक लावले…

114
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांच्या मागणीला यश; बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल…

बांदा,ता.२९: वाफोली धरण परिसरात असलेल्या धोकादायक वळणावर अखेर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी फलक नसल्याने बांदा दाणोली या रस्यावर गेले काही महिने अपघाताची संख्या वाढली होती. समोरून येणाऱ्या वाहणारा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात होत होते. त्यामुळे त्या ठिकाणी फलक लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आले होती.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे, गुरु कल्याणकर हेमंत दाभोलकर आदींनी उचल घेऊन बांधकाम विभागाला त्या ठिकाणी फलक लावण्या संदर्भात सूचना केली होती. त्यानुसार हे फलक लावण्यात आले आहेत. त्याबद्दल त्यांनी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद लोहार यांचे आभार मानले.