माडखोल येथील व्ही.पी कॉलेजच्या डी. फार्मसीचा ९९.९० टक्के निकाल…

193
{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२९: माडखोल येथील व्ही. पी कॉलेजच्या डी. फार्मसीचा ९९.९० टक्के निकाल लागला. यात संध्या कांबळे ही ८४.८१ टक्के गुणांसह प्रथम आली आहे, तर साक्षी गवस ही ८२.२७ टक्के गुण मिळून व्दीतीय व निकिता धुरी हिने ८२.१८ टक्के गुण तृतीय क्रमांक मिळवला आहे.महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आज हा निकाल जाहीर करण्यात आला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटिल, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.