मी महायुतीचा मंत्री, राजन तेलींवर काय बोलणार…?

394
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; मला आमदार करावे की न करावे हा निर्णय जनतेचा…

सावंतवाडी,ता.२९: मला आमदार करावे की न करावे याचा सर्वस्वी निर्णय जनता घेणार आहे. मी मंत्री आहे. त्यामुळे जे तब्बल २ वेळा पराभूत झाले त्यांच्यावर काय बोलू? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान अशा प्रकारे पक्षाबाबत उघड चर्चा करू नये, असे त्यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माझ्यासमोर तेली यांना बजावले होते. मात्र असे असताना सुद्धा ते उघड बोलत आहेत. मात्र मी तसे वागणार नाही, असे ते म्हणाले. राजन तेली यांनी आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे सावंतवाडी मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात यावा. दीपक केसरकर भाजप कार्यकर्त्यांच्या भरवशावर विधानसभा निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप वजा आवाहन असलेले पत्र सादर केले होते.

याबाबत श्री. केसरकर यांना छेडले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, या ठिकाणी मला आमदार करावे की न करावे याचा सर्वस्वी निर्णय सावंतवाडी विधानसभेतील जनता घेणार आहे. त्यामुळे २ वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांच्या विरोधात मी बोलणार नाही. मी महायुतीचा नेता आहे. त्यामुळे मला महायुतीचा धर्म पाहायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी कोणावर टीका-टिपणी करणार नाही. राहिला विषय पक्षाचा तर आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही, असे खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तेली यांना माझ्यासमोर सुनावले आहे, असे असताना सुद्धा ते नेमके का बोलतात? ते मी कसे सांगणार? असा उलट प्रश्न केसरकर यांनी केला.