ठेवीदार आणि कर्मचार्‍यांच्या भल्यासाठीच सावंतवाडी अर्बन विलीनीकरणाचा निर्णय…

507
2
Google search engine
Google search engine

सुभाष पणदुरकरांकडून स्पष्टीकरण; सभासदांना विश्वासात घेतले नाही, बापू गव्हाणकरांचा आरोप…

सावंतवाडी,ता.२९: ठेवीदारांच्या आणि कर्मचार्‍यांच्या भल्यासाठी सावंतवाडी अर्बन बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. ही काळाची गरज आहे. आमचे वागणं हितासाठी आहे. आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बँकेचे विलनीकरण हेच आमच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे, अशी भूमिका आज येथे आयोजित अर्बन बँकेच्या सर्वसाधारण बैठकीत अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पणदुरकर यांनी मांडली. दरम्यान बँक वाचविण्यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले. परंतू त्या ठिकाणी आरबीआयच्या गाईडलाईन्स आणि ३० दिवसाची दिलेली मुदत त्यामुळे मनात असताना सुध्दा आम्ही काहीच निर्णय घेवू शकलो नाही. त्यामुळे विलीनीकरण करणे हा निर्णय योग्य, असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी अर्बन बँक ठाणे सहकारी ग्रामीण बँकेत विलीनीकरण करण्यासाठी सभासदांची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. यावेळी सभासदांचे मतदान घेण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या अ‍ॅड. बापू गव्हाणकर, नकुल पार्सेकर आदी सभासदांनी हा चुकीचा निर्णय घेतला आहे. याबाबत कोणाला विश्वासात घेतले गेले नाही. बँक दिवाळ खोरीत जाण्यासाठी संचालक मंडळ जबाबदार आहे, असा आरोप केला. मात्र या सभेत आपण ग्राहकांच्या व कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार करुन हा निर्णय घेतला. अन्यथा बँकचा परवाना रद्द झाला असता. त्यावेळी आम्ही काहीच करू शकलो नसतो, अशी भूमिका श्री. पणदुकर यांनी मांडली.

यावेळी संचालक गोविंद वाडकर, उपाध्यक्ष रमेश बोंद्रे, रमेश पई, अशोक दळवी, उमाकांत वारंग, सौ. मृणालिनी कशाळीकर, सौ. अपर्णा कोठावळे, सुरेश बोवलेकर, राजेश पनवेलकर, आनारोजीन लोबो, मधुकर देसाई, बबन साळगावकर, संतोष टकले, सिताराम गावडे, राजन पोकळे, संजय भोगटे, गणेशप्रसाद गवस , हेमंत मराठे, लक्ष्मीकांत पणदूरकर, नारायण राणे, राजू बेग, प्रेमानंद देसाई, गोविंद बांदेकर, पी. डी. देसाई, विनोद सावंत, सुरेंद्र बांदेकर, महेश सुकी, आबा केसरकर, महेश आळवे, द्वारकानाथ घुर्ये, महेश धुरी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

अँड. पणदूरकर म्हणाले, १०० कोटींचे भांडवल गोळा करण्याचा तगादा रिझर्व्ह बँकेने लावला. तसेच ३० जून पर्यंत एक महिन्याच्या आत पुर्तता करण्याबाबत निर्देश दिले होते. रिझर्व्ह बँकेच्या फतव्यामुळे बँक परवाना, डिपॉझीट व्याजसह, कर्मचारी, कर्जदार यांचा विचार करून जनता सहकारी बँक ठाणे मध्ये विलीनीकरण होण्यासाठी निर्देश मिळाले. विलीनीकरण करण्यात येणारी बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे सुरळीत व्यवहार होतील म्हणून रिझर्व्ह बँक धोरणानुसार बँक विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला.

रिझर्व्ह बँक, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मंत्री वळसे पाटील यांना साखर कारखान्यांना सरकार आर्थिक मदत करते, तशी मदत करण्याची विनंती केली. राज्यातील आजारी बँकना १ हजार कोटी रुपयांची मदत करण्याची विनंती केली. मात्र आचारसंहिता लागू असल्याने निर्णय झाला नाही. तसेच रिझर्व्ह बँकेने मुदत दिली त्याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे.

श्री. पणदूरकर पुढे म्हणाले, आजारी बँक मध्ये सावंतवाडी अर्बन बँक आहे. बँक परवाना जाऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर केला. अर्बन बँक कर्मचारी, डिपाॅझीट, आदींचे यामुळे संरक्षण होईल. या दरम्यान अँड. बापू गव्हाणकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जात नाही, असे सांगुन हरकत घेतली. तर अँड. नकुल पार्सेकर, संतोष टकले यांनी सभासद हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जात नाही असे सांगितले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँक विलीनीकरण होणार तेव्हा सभासदत्व संपलं याकडे लक्ष वेधले.

पणदूरकर म्हणाले, अर्बन बँक ७७ वर्षांची आहे. अतिशय कठीण आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याने निर्णय घेतला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या विलीनीकरणाचा धोरणानुसार मतदान घेण्यासाठी ऑडिटर वासुदेव शिरोडकर व सहाय्यक सदानंद चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार मतदान झाले. यावेळी गोविंद वाडकर यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले.