तोरसोळेतील बेपत्ता विवाहीतेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…

230
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.२९: तोरसोळे-आंबोळवाडी येथील बेपत्ता विवाहीतेचा मृतदेह आज घराच्या परिसरात असलेल्या नदीपात्रात आढळून आला. संगीता संतोष कडव (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. त्या काल पासून बेपत्ता होत्या. याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली होती. घरातल्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्या कुठेही आढळून आल्या नव्हत्या. आज घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची खबर तिचे दीर पंढरीनाथ कडव यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करत आहे.