मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग आता पुन्हा हिरवागार होणार…

261
2
Google search engine
Google search engine

मुळदे विद्यालयाचा पुढाकार ; उद्या पाच किलोमीटर मध्ये होणार वृक्ष लागवड…

कुडाळ ता.२९: मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग आता पुन्हा हिरवागार होणार आहे.यासाठी मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
त्या ठिकाणी उद्या वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी वृक्ष संवर्धन जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी व पथनाट्य सादर करण्यात येणार आहे . याबाबतची माहिती उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत कदंब, शिसम कांचन, बेहडा, करंज,अर्जुन, बांबू उंबर, कोकम, पिंपरी, चिंच,आवळा, अशोक अशा प्रकारचे अनेक वृक्ष लावण्यात येणार आहेत. कुडाळ-बेलनदी ते वेताळ – भांबर्डे तिठा या ५ किलोमीटर पर्यंत ही लागवड करण्यात येणार आहे.