निगुडे मार्गे सोनुर्लीला जाणारी एसटी बस सेवा तात्काळ सुरळीत करा…

58
2
Google search engine
Google search engine

समीर गावडे; अन्यथा १० जुलै नंतर बेमुदत आंदोलन…

बांदा,ता.३०: निगुडे मार्गे सोनुर्लीला जाणारी एसटी बस सेवा तात्काळ सुरळीत करा, अन्यथा १० जुलै नंतर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच समीर गावडे यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांना दिला आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, निगुडे-सोनुर्ली बसची मागणी कित्येक वेळा करण्यात आली आहे परंतु बस फेरी अद्याप पर्यंत चालू करण्यात आली नाही. त्याच प्रमाणे मडुरा हायस्कूलला जाणारी बस नियमित वेळेत येत नाही. पावसाळ्यात बस वेळेत न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करा अन्यथा १० जुलै नंतर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गावडे यांनी आगार व्यवस्थापकांना दिला आहे. यावेळी निगुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर जाधव उपस्थित होते.