जिल्हा ओबीसी महासंघाच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन…

34
2
Google search engine
Google search engine

विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार; पोलीस पाटलांचाही सत्कार…

कुडाळ,ता.३०: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्गच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा १ जुलैला कुडाळ येथे होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व अण्णा केसरकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी आणि आरक्षित समाजातील लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय प्रतिनिधी सुनील भोगटे, अध्यक्ष नितीन वाळके, कार्याध्यक्ष रमण वांगणकर, महासचिव नंदन वेंगुर्लेकर, खजिनदार बाळासाहेब बोर्डीकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, तसेच सर्व सलग्न ज्ञाती समाज संघटना जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारणी यांनी केले आहे.

या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून शालांत आणि उच्च माध्यमिक परीक्षा स्तरावर उज्वल यश संपादन करणाऱ्या समाज घटकातील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व पोलीस पाटील परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचाही सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यालय उद्घाटन भोगटे कंपाउंड, राज हॉटेल शेजारी कुडाळ येथे होईल तर बैठक ओंकार डिलक्स विविध सेवा भवन उद्यमनगर कुडाळ येथे होणार आहे.