विशाल परब यांच्या माध्यमातून शिरोडा येथे छत्र्यांचे वाटप…

111
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.३०: भाजपचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून शिरोडा येथील व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. श्री. परब यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस छोट्या विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप केले जात आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या ठिकाणी यापूर्वी या छत्र्या वाटप करण्यात आल्या. आज ही मोहीम शिरोडा येथे राबविण्यात आली. त्यांनी दिलेल्या छत्र्या पाहून तेथील व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी यूवा मोर्चा उपाअध्यक्ष सागर राणे, माजी सरपंच मनोज उगवेकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, भाजप तालुका प्रमुख लक्ष्मीकांत करपे, रेडी सरपंच रामशिंग राणे, शक्ती केंद्र प्रमुख रेडी जगन्नाथ राणे, शक्ती केंद्र प्रमुख आरवली महादेव नाईक, बूत अध्यक्ष एकनाथ साळगांवकर, शिरोडा सदस्य अर्चना नाईक, ज्ञानेश्वर केरकर, ओंकार कोनाळकर, रूपेश बांदेकर, महेश कोनाळकर, समीर कांबळी, मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, बाळू वस्त आदी उपस्थित होते.