तलवारबाजीत न्युझीलंड पर्यंत बाजी, मात्र पुढचा प्रवास खडतर…

263
2
Google search engine
Google search engine

नेरूरच्या सुकंन्येची कहाणी; मदतकार्य करण्याचे आवाहन…

कुडाळ/निलेश जोशी,ता.३०: तलवारबाजी मध्ये न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कुडाळ-नेरूरची सुकंन्या तनुजा विनोद लाड हिने बाजी मारली आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढच्या प्रवासात तिला अडचणी आहेत. त्यामुळे समाजातील दानशुर आणि क्रीडा प्रेमींनी तिला आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. सध्यास्थितीत ती मुंबई येथे वास्तव्यास आहे.
मुंबईस्थित वालावल गावचे सामाजिक कार्यकर्ते दयानंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून, तनुजा विनोद लाड ही मुंबईला राहते. मात्र ती कुडाळ तालुक्यातील नेरुर-देऊळवाडा येथील रहिवासी असून रूपारेल कॉलेजमध्ये शिकत आहे. या मुलीची निवड न्यूझीलंड येथे १२ जुलै ते १९ जुलै २०२४ ला होणाऱ्या कॅडेट आणि कनिष्ठ कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेकरिता झाली आहे. तनुजाने विविध राष्ट्रीय स्पर्धांमधून घवघवीत यश मिळविले आहे. तिची ही निवड झाली तरी केंद्र सरकार अथवा राज्यसरकार, याकरिता कोणताही खर्च करणार नसल्याने न्युझिलंडचा प्रवास खर्च व तेथे रहाण्याचा खर्च स्वतः करावा लागणार आहे.
कोकणातील ही मुलगी या स्पर्धेपासून वंचित राहू नये म्हणून या मुलीच्या वतीने समस्त कोकणवासीयांनी यथाशक्ती या मुलीला आर्थिक मदत करावी, असे आवाहन मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबईचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केले आहे. यासाठी त्यांनी कुमारी तनुजा विनोद लाड मोबाईल जीपे नंबर-8928527089, बँक-पंजाब अँड सिंध बँक, अकाउंट नंबर 03291000016101, आयएफसी कोड – PSIB0000329 असे बँक डिटेल्स दिले आहेत.