खुडीपाट येथील बेपत्ता वृध्देचा ओहोळात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

270
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.३०: तालुक्यातील खुडीपाट येथील गेल्या १० दिवसापुर्वी बेपत्ता असलेल्या वृध्देचा मृतदेह काल सायंकाळी हसनवाडी ओहोळात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शोभा धाकू जोईल (वय ८०) असे त्यांचे नाव आहे. त्या मानसिक आजारी असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. त्या घरातून अधुनमधून जात होत्या व घरी परत येत होत्या. मात्र १७ जुनला त्या घरातून निघून गेल्या. त्यांची शोधाशोध करूनही त्या आढळून आल्या नाहीत. काल त्यांचा मृतदेह हसनवाडी ओहोळात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची खबर त्यांचा मुलगा संजू जोईल यांनी पोलिसात दिली. त्यानुसार देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.