“नृत्यधारा” अकॅडमीचे पिंगुळीत थाटात उद्घाटन…

127
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.३०: तालुक्यातील पिंगुळी गावातील नृत्यांगना मृणाल सावंत यांच्या माध्यमातून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे “नृत्यधारा” अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी या अकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि विशेषता कुडाळातील नृत्य चळवळ वृद्धिंगत होईल, असा विश्वास श्री. जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, तसेच भरतनाट्यमच्या संचालिका कविता राऊळ, अजय सावंत, प्रतीक्षा सावंत, रतन नादोसकर, गुरू देसाई, प्रशांत माने, गुरुनाथ पाटकर, सुशांत पिंगुळकर, नितीन शेबटकर, यशवंत बाबार्डेकर, गुणाजी जाधव, राकेश गावडे, साईप्रसाद चव्हाण, प्रमोद पालकर, नागेश नाईक, तुळशीदास पाटकर, सौ. शिरोडकर, अनुष्का सावंत, ओंकार सावंत आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.