भटवाडी येथे अंगणात आलेल्या अजगराला सर्पमित्र हेरेकरांकडून जीवदान…  

396
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: येथील भटवाडी परिसरात अंगणात आलेल्या ८ फुटी अजगराला सर्पमित्र नवीद हेरेकर व नबीला हेरेकर यांनी पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.

काल रात्री श्री. वेंगुर्लेकर यांच्या अंगणात हा अजगर दिसला. त्याला पाहताच लोकांची तारांबळ उडाली. यावेळी बाबा आल्मेडा यांनी हेरेकर कळविले. यावेळी श्री. हरेकर यांनी आपल्या पत्नीसह त्या अजगराला पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. विशेष म्हणजे नबीला हेरेकर यांचे अशा धाडसी कामात आपल्या पती सोबत खंबीरपणे उभे राहणे हे महिला सशक्तीकरणचे खरे उदाहरण आहे.