कुडाळातील “आपला दवाखान्या”ला कुलूप, विज जोडणी अर्धवट… 

353
2
Google search engine
Google search engine

ठाकरे गटाकडून प्रकार उघड; राणे व नाईक यांच्यातील दाव्या प्रतिदाव्यानंतर पाहणी…

कुडाळ,ता.०१: शासनाच्या माध्यमातून कुडाळ येथे उभारण्यात आलेल्या आपला दवाखान्याला कुलूप असल्याचे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पुराव्यानिशी उघड केले आहे. तसेच सर्व काही आलबेल असल्याचा दावा करुन सत्ताधारी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत अधिवेशनात ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले होते. तसेच काही दवाखाने बंद असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सर्वच दवाखाने सुरू असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर दवाखान्यांची पाहणी करून हा दावा करण्यात आला आहे.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, कृष्णा धुरी, राजू गवंडे, अतुल बंगे, राजू गवंडे, गुरुनाथ गडकर आदी उपस्थित होते.