“एक पेड मा के नाम” हा उपक्रम सावंतवाडीत प्रभावीपणे राबविणार…

168
2
Google search engine
Google search engine

विशाल परब; मळेवाड शाळेत वृक्षारोपण करून उपक्रमाला सुरूवात…

सावंतवाडी,ता.०१: भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम सावंतवाडी मतदार संघात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असा संकल्प भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केला आहे. दरम्यान आज त्यांनी मळेवाड येथील पंचक्रोशी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण केले तसेच सिंधुदुर्गात ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
षमहाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून कृषी दिनाचे औचित्य साधून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.