आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून कृषी क्षेत्र समृद्ध करूया..

70
2
Google search engine
Google search engine

मकरंद देशमुख; कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान…

कुडाळ,ता.०१: पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून कृषी क्षेत्र समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी आज येथे केले. कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी वीरेश अंधारे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग विजयकुमार राऊत, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जानबा झगडे, स्मार्ट प्रकल्प मूल्य साखळीतज्ञ लक्ष्मण खुरकुटे, प्रकल्प उपसंचालक आत्मा सिंधुदुर्ग नामदेव परीट, तंत्र अधिकारी रवींद्र पाटील, गट विकास अधिकरी धनंजय जगताप, सहाय्यक गट विकास अधिकारी श्याम चव्हाण, गोविंद चौगुले, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस श्री. धामापूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी मंगेश कदम खांबाळे वैभववाडी, देवेंद्र नारकर फणसगाव देवगड, सदानंद गवस धाकोरे सावंतवाडी, रवींद्र गावडे नापणे वैभववाडी, अर्जुन रेडकर आरोंदा सावंतवाडी बाबा पाटणकर पडेल देवगड प्रभाकर डाफळे नाधवडे वैभववाडी, राजाराम गुरव खांबाळे वैभववाडी, संतोष पडवळ,तसेच विद्याधर सुतार सेवा निवृत्त बीडीओ, श्रद्धा आढळकर ग्रामसेवक ग्रामपंचायत तुळसुली कार्याद नारुर, प्रियांका प्रकाश चव्हाण ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत तुळसुली कार्याद नारुर, भूषण चव्हाण ग्रामविकास अधिकारी घावनळे, नम्रता माडेश्वर ग्राम रोजगार सेवक घावनाळे, वासुदेव कसालकर ग्राम विकास अधिकारी वाडोस, प्रसन्ना म्हाडगूत, ग्राम रोजगार सेवक वाडोस, महादेव खरात विस्तार अधिकारी पंचायत समिती कुडाळ, सानिका पालव ग्रामसेवक भडगाव बुद्रुक, सतीश साळगावकर ग्रामसेवक कवटी, संतोष खोत प्रगतशील शेतकरी बांबू लागवड, राणे गुरुजी कसाल प्रगतशील शेतकरी,कृषी विषयक पुस्तके स्टॉलधारक गोविंद चौगुले कोल्हापूर, स्थानिक देशी कृषी बियाणे स्टॉलधारक जयराम परब आणि सूर्यकांत कुंभार यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विस्तार अधिकारी जानबा झगडे यांनी तर सूत्रसंचालन कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे बाळकृष्ण परब, महादेव खरात, संदेश परब, दत्ताराम आंबेरकर, अमित देसाई, तालुका कृषीचे अमोल करंदीकर, श्री. धारगळकर, श्री. कामतेकर उपस्थित होते तसेच जिल्हाभरातून शेतकरी बांधव उपस्थित होते.