निरवडेत ५ जूलैला ई पिक पाहणी व शेती विषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन…

82
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने ५ जुलैला सकाळी १० वाजता निरवडे ग्रामपंचायतीत ई पिक पाहणी व शेती विषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, संचालक विद्याधर परब, तहसीलदार श्रीधर पाटील, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, कृषी अधिकारी श्री. गवाणे तसेच खरेदी-विक्री संघाचे संचालक आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याबरोबरच शासनाच्या भात पीक हमीभाव योजनेचा लाभ घेण्याकरिता ई पीक पाहणी द्वारे सातबारा व चालू हंगामातील पिकाची नोंद होणे आवश्यक आहे. बरेच शेतकरी ई पीक पाहणी अभावी या योजनेपासून वंचित राहतात, त्याबद्दल महसूल विभाग माहिती देणार आहेत. यावर्षी भात पीक हमीभाव प्रति क्विंटल २ हजार ३०० रूपये जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी तसेच शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी निरवडे ग्रामपंचायत मध्ये कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.