बांदा-बोरिवली-कुडाळ ही स्लीपर सेवा बंद करण्याचा निर्णय…

340
2
Google search engine
Google search engine

भारमान घटल्याचे कारण; निलेश तेंडुलकर आक्रमक, वरिष्ठांचे लक्ष वेधणार…

कुडाळ,ता.०१: भारमान मिळणार नाही असे गृहीत धरून मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली बांदा-बोरिवली-कुडाळ ही स्लीपर सेवा बंद करण्याचा निर्णय कुडाळ आगाराकडून घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते तथा एसटी कर्मचारी संघाचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत एसटीचे अधिकारी संदीप पाटील यांना जाब विचारला. दरम्यान ही सेवा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण भाजप नेत्यांच्या माध्यमातून लक्षवेधू असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून तेंडुलकर यांनी माहिती दिली आहे.