मुक्ताई ॲकेडमीच्या बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

82
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: येथील मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात देवगड, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडीतील ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबीराचे उद्घाटन हस्ताक्षर तज्ञ विकास गोवेकर हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमती अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर आदी उपस्थित होते. दरम्यान ॲकेडमीत नियमित प्रशिक्षण घेणाऱ्या यश सावंत, साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, चिदानंद रेडकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.