मालवणातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा…

93
2
Google search engine
Google search engine

अजय पाटणे : तालुक्यातून ९० हजार २१५ मतदार हक्क बजावणार…

मालवण, ता. १७ :

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. कुडाळ-मालवण मतदार संघातील मालवण तालुक्यात एकूण १२१ मतदान केंद्र असून एकूण ९०,२१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.
२१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे. तालुक्यातून ४३,९०३ पुरुष व ४६,३१२ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आवश्यक त्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना ये- जा करण्यासाठी सुविधा व व्हीलचेअर उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून दिली आहे. तसेच मतदान केंद्रावर पाळणाघर व स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. तरी तालुक्यातील सर्व मतदारांनी २१ रोजी आपल्या भागातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.