पुरहानीत नुकसान झालेल्या दुकानदारांना आठवड्याभरात भरपाई

84
2
Google search engine
Google search engine

दिपक केसरकर: ६७ कोटींची तरतूद,शेतक-यांबाबत वेगळा निर्णय

सावंतवाडी.ता,१५: कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या दुकानदारांना पुरहानीची मदत म्हणून ६७ कोटी रुपयांची मदत येत्या आठवडाभरात देण्यात येणार आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा हेक्टरी वीस हजाराचे नुकसान देण्याबाबत लवकरच आदेश काढले जातील अशी माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नव्याने वादळी परिस्थिती झालेल्या नुकसान भरपाई आहेत.मात्र सरकार न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना अडचणी निर्माण येणार आहेत.तरीही ती तांत्रिक बाप दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे केसरकर यांनी सांगितले केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले मध्यंतरी निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्या कोकणातील अनेक दुकानदारांचा व्यावसायिकांचे नुकसान झाले होते.तो आकडा मोठा होता. त्यामुळे इतिहासात प्रथमच अशा नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता.ते पैसे येत्या आठवडाभरात संबंधित नुकसान ग्रस्त यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील तसेच शेती झालेले नुकसान लक्षात घेता त्यांचे कर्ज माफ अथवा १४८० आमचे प्रयत्न सुरू आहेत.
नुकत्याच झालेल्या वादळी परिस्थिती नंतर नुकसान झाले आहे.समुद्रात तितर पक्षी असल्यामुळे त्याठिकाणी मच्छिमार जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच अन्य पर्यटनाच्या काळात अनेक हॉटेल व्यावसायिकांची नुकसान झाले आहे.त्यामुळे त्यांना वर पाहिजे कोकणातील झाडा संदर्भात नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध निर्णय घेण्यात येणार आहे. असे केसरकर म्हणाले.