दीपक केसरकर;प्रमोद जठार हे डुप्लीकेट जिल्हाध्यक्ष…
सावंतवाडी ता.२५: भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे डुप्लीकेट जिल्हाध्यक्ष आहेत.त्यांची भूमिका कायम दुपट्टी राहीली आहे.अन्नपुर्णा कोरगावकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणा-या जठारांनी विधानसभेवेळी राजन तेलींवर कारवाई का केली नाही,असा प्रश्न माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केला.सौ.कोरगावकर यांच्यावर झालेल्या हकालपट्टीच्या कारवाई नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या ठीकाणी कोरगावकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली.हा सर्व प्रकार चुकीचा आणि एकतर्फी आहे.अशी हकालपट्टी पक्षाशी बंडखोरी करून विधानसभेत अपक्ष राहणा-या तेलींची का केली नाही? ही केवळ त्यांची भूमिका नाही,तर त्यांच्या पक्षाची सुध्दा आहे.प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा हा भाजपाचा डाव आहे. असाही आरोप श्री केसरकर यांनी यावेळी केला.